प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटी भाग्यनगर शाखेतर्फे गुरुवारी येथील विभागीय कार्यालयाच्या सभागृहात मधुमेह आणि रक्तदाब मोफत तपासणी शिबिर पार पडले.
माधवबाग क्लिनिकचे डॉ. संगीता खांजे, डॉ. अमेय पाटील यांचे रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. असिस्टंट मॅनेजर सी. आर. पाटील यांनी डॉ. शिल्पा रसाळ, डॉ. कोमल जाधव यांचे स्वागत केले.
भाग्यनगर शाखेचे व्यवस्थापक संतोष कुलकर्णी म्हणाले, सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांनी 27 वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, दिल्लीपर्यंत पसरले आहे. सोसायटीच्या विविध शाखांमध्ये सभासदांसाठी मोफत नेत्रतपासणी, दंतचिकित्सा, मधुमेह, रक्तदाब अशी शिबिरे मोफत राबविली जात आहेत.
लहान मुलांसाठी चित्रकला, किल्ला, घरगुती गणेश सजावट, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात. विजेत्यांना पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले जाते. यावेळी संचालक प्रभाकर पाटकर, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगाणकर, ऑफिसर राधिका दिवेकर, मयूर खटावकर, कोमल जाधव, संध्या गावडे यासह सभासद उपस्थित होते.