युवा रक्तदाता संघटनेच्या इशाऱ्याची तात्काळ दाखल
Dialysis facility in Sawantwadi resumed
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अनेक दिवस बंद असलेली डायलेसिस मशिन लोकवर्गणीतून दुरुस्त करण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी देताच याची आरोग्य प्रशासनाने तत्काळ दखल घेत ही मशिन दुरुस्त करून डायलेसिस सुविधा पूर्ववत सुरु केली. त्यामुळे युवा रक्तदाता संघटनेचे डायलेसिस रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे.
सावंतवाडी तील डायलेसीस मशीन बंद असल्यामुळे डायलेसीस रूग्णांचे हाल होत होते. याबाबत प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या निषेधार्थ युवा रक्तदाता संघटनेने लोकवर्गणीतून बंद असलेली डायलिसिस मशीन दुरुस्त करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य यंत्रणेने याची त्वरीत दखल घेत ही बंड मशिन दुरुस्त करून डायलेसिस सुविधा पूर्ववत सुरु केली.त्यामुळे देव्या सुर्याजी यांचे डायलेसिस रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे.
ओटवणे / प्रतिनिधी