प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदीसाठी 1500 रुपये खर्च
प्रतिनिधी /बेळगाव
भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने नसबंदी मोहीम हाती घेतली आहे. याकरिता बेंगळूर येथील कंपनीला कंत्राट दिले आहे. मात्र नसबंदी केलेल्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने मोठय़ा प्रमाणात नसबंदी करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत केवळ दहा कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील प्रत्येक गल्लीच्या कोपऱयावर भटक्मया कुत्र्यांचा कळप ठाण मांडून बसत आहे. विशेषतः कचराकुंडी परिसरात भटक्मया कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. रात्रीच्यावेळी रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांना धोकादायक ठरत आहे. तसेच लहान मुलांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढल्याने जीव धोक्मयात आले आहेत. भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. याची दखल घेवून महापालिकेने नसबंदी मोहीम राबविण्याचा निर्णय घेऊन कंत्राट दिले आहे. सदर कंत्राट बेंगळूर येथील कोवा या कंपनीला देण्यात आले असून प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदीसाठी 1500 रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
केज वरच्याबाजूने खुले असल्याने अडचण
महापालिकेने श्रीनगर येथे अत्याधुनिक पद्धतीचे ऑपरेशन थिएटर व कुत्र्यांना ठेवण्यासाठी 30 केज निर्माण केले आहेत. मात्र महापालिकेने निर्माण केलेले केज हे वरच्याबाजूने खुले आहे. त्यामुळे कुत्र्यांना बंदिस्त ठेवताना अडचण येत आहे. काही कुत्री केजवरून उडी टाकून बाहेर पळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दररोज 25 ते 30 कुत्री पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी कंत्राट घेतलेल्या कंपनीची आहे.
जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
सध्या केवळ 10 कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया करण्यात आली अहे. शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांना चार दिवस देखरेखीखाली ठेवावा लागते. त्यामुळे या कुत्र्यांना कुठे ठेवायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ 30 केज असल्याने उर्वरित कुत्र्यांना बंदिस्त ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कंपनीने महापालिकेकडे केली आहे. ही जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच ही मोहीम युद्धपातळीवर चालविणे शक्मय आहे.