आयपीएस अधिकाऱ्याने दिला मोलाचा सल्ला
विवाह समारंभांपूर्वी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, साखरपुडा, प्री वेडिंग शूट, मेहंदी, हळद इत्यादी अनेक कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात. विवाह ठरलेले जोडपे विविध ठिकाणी जाऊन अनोख्या थीमवर खास कपडे परिधना करून छायाचित्रण करवून घेतात. प्री वेडिंग शूटचे प्रस्थ आता मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विवाह ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं खास प्री वेडिंग शूट सध्या व्हायरल होत आहे.
हैदराबादमधील एका जोडप्याचे प्री-वेडिंग शूट व्हायरल झाले आहे. हे जोडपे दोघेही पोलीस अधिकारी आहेत. प्री वेडिंग शूटसाठी त्यांनी पोलिसांच्या गणवेशात आणि अधिकृत वाहनाचा वापर केला आहे. प्रारंभी महिला अधिकारी पोलिसांच्या अधिकृत वाहनातून गणवेश घालून बाहेर येते आणि स्थानकातील इतरांशी संवाद साधते, तितक्यात पोलिसांची दुसरी गाडी येते आणि त्यातून एक पोलीस अधिकारी येतो आणि तो महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रेमात पडतो. मग त्यांची प्रेमकथा सुरू होते. या जोडप्याला विविध ठिकाणी नृत्य करताना प्री वेडिंग शूटमध्ये दाखविण्यात आले आहे.
हे प्री वेडिंग शूट पाहून आयपीएस अधिकारी सी.व्ही आनंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही अधिकारी स्वत:च्या विवाहाबद्दल अधिक उत्साही असल्याचे दिसते आणि ही चांगली गोष्ट आहे. दोघांनी पोलीस गणवेश आणि अधिकृत वाहनाचा वापर करण्याबद्दल कळविले असते तर आम्ही शूटसाठी नक्कीच संमती दिली असती असे त्यांनी म्हटले आहे.