सैन्य दलाकडून 6 लाख रूपयांची थकबाकी वसुल करावी : पालीकेची शांतीनगर येथील इमारत धोकादायक , सोपो पावणी त्वरीत करा
प्रतिनिधी /फोंडा
फोंडयीतल व्यापाऱयांना विक्री परवान्यात केलेली अवाढव्य वाढ कमी करावी, पालीकेचा महसुल वाढविण्यासाठी सोपो पावणी तातडीने करण्यात यावी. पालीका बैठकीत क्रांती मैदानाजवळील सैन्य दलाकडे असलेल्या जमिनीचे थकबाकी सुमारे 6 लाख रूपयांची भाडेपट्टी पालीकेने त्वरीत वसुल करून घ्यावी त्यानंतरच 6 टीटीआर सैन्य दलाला तीन वर्षासाठी मुदतवाढ द्यावी अशा ठरावासह अन्य विविध विषयावर चर्चा काल शुक्रवारी झालेल्या पालीका बैठकीत करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी, नगरसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते. व्यापाऱयांना सभागृह, बॅक, फार्मसी, सोने चांदीचे दुकान व्यवसायाप्रमाणे विक्री परवान्यात भरघोस वाढ केलेली आहे. साधारण वर्षाकाठी रू 500 विक्री परवाना शुल्क असलेल्या व्यापाऱयाला रू 5000 पर्यंत भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. यासंबंधी व्यापारी संघटनेने पालीकेला निवेदन सादर केले होते. तसेच नगरसेवकांचा वाढता विरोध लक्षात घेता यासंबंधी चर्चा व विक्री परवाना शुल्क ठरविण्यासाठी येत्या दिवसात बैठक बोलाविण्यात येणार आहे. शांतीनगर फोंडा येथील पालीकेची मालकी असलेल्या इमारतीत वास्तव्यास असलेल्या 12 भाडेधारकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्याजागी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पालीकेचा या इमारतीत एकूण 16 फ्लॅट आहेत. दादा चौक परिसरातील शास्त्राr सभागृह इमारतीप्रमाणे शांतीनगर येथील इमारत कमकुवत झाली असून राहण्यासाठी सुरक्षित नसल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. पालीका क्षेत्रातील वाहतूक कोंडी व फेरीवाल्याचे रस्त्यावर अतिक्रमण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे बैठक घेण्यात येणार आहे. वाहन पार्किगची समस्येवरही तोडगा यावेळी काढण्य़ात येईल. मार्केट प्रकल्पातील 24 दुकानदाराच्या थकबाकीसाठी ओटीएस योजना राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. नगरसेवक विश्वनाथ दळवी, प्रदीप नाईक, व्यंकटेश नाईक, शांताराम कोलवेकर यांनी विविध विषयावर मुख्याधिकारी गोसावी यांनी जाब विचारली. रखडत असलेल्या विकासकामे, सामान्य जनतेला ना हरकत दाखला देण्यासाठी वेळकाडू धोरण अवलंबण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे इशारा नगरसेवकांनी दिला.