बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्यावतीने बसवाणगुडी व हलसूर येथील जलतरण तलावात घेण्यात आलेल्या सबज्युनियर – ज्युनियर व सिनियर जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत बेळगाव आबा स्पोर्ट्स क्लब व हिंद सोशल जलतरण क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना एक सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी एकूण तीन पदके पटकाविली. आशुतोष बेळगोजी याने सिनियर स्टेट लेव्हल स्पर्धेत 1 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले. दिशा हुंडीने मुलींच्या गट क्रमांक तीनमध्ये 50 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक तसेच 100 मी. फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली. स्मरण मंगळूरकर, वेदा खानोलकर, वरद खानोलकर, श्लोक जाधव, आरोही चित्रगार यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून आपापली कामगिरी उंचावली. दिशा होंडी हिने आपल्या गटामध्ये सर्वात जलद जलतरणपटू हा बहुमान पटकाविला. तसेच तिची ऑगस्ट महिन्यामध्ये ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य जलतरण संघात अभिनंदनीय निवड झाली आहे. त्याचबरोबर आशुतोष बेळगोजी याचे जून 21 ते 25 रोजी बेंगळूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, मारुती घाडी, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, किशोर पाटील व सतीश धनूचे यांचे मार्गदर्शन तसेच हिंद क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, आबा क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते, सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभले.
Previous Articleब्ल्यू लॉक, वेझर्ड, एफवायव्हीपीपी, फ्यूजन संघ उपांत्य फेरीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.