बेळगाव प्रतिनिधी – महापालिका निवडणुकीला वर्षपूर्ती झाली पण महापौर- उपमहापौर निवड झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ वर्षपूर्ती सोहळ्याच्या आयोजन नगरसेवकांनी केले होते. मात्र प्रशासकांच्या कक्षातून नगरसेवकांना बाहेर हाकलण्याचा प्रकार महापालिका आयुक्तांनी केला. या ठिकाणी बसण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही, असे सांगून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी आम्ही नगरसेवक आहोत की नाही ?असा प्रश्न उपस्थित केला, व महापालिका कार्यालयासमोर केक कापून प्रशासनाच्या निष्कर्तेपणाचा निषेध नोंदविला, यावेळी महापालिका कार्यालयासमोर गोंधळ झाला त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
Related Posts
Add A Comment