अगसगे/ वार्ताहर
विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व प्रोत्साहन मिळावे, यासाठी बंबरगे येथील मराठी शाळेत शाळा सुधारणा अध्यक्षांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.
मातृ भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा संतू डोंबले यांनी हा उपक्रम राबवला आहे. नुकताच शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. इयत्ता पहिलीला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याअभावी गैरसोय होते. याची दखल घेऊन अध्यक्षानी साहित्य वाटप केले आहे. यावेळी मुख्याध्यापिका यू. एम. कौलगे, शिक्षक ए. जी. बेन्नाळकर, सचिन कोकितकर, एस. एस. मामणी व बळवंत कोळे उपस्थित होते.