प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स गुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीतर्फे नंदन मक्कळ धाम आश्रमाला तीन महिने पुरेल इतके धान्य व ड्रायप्रुट्सचे वाटप करण्यात आले. प्राईड सहेलीच्या सदस्या अरुणा शहा यांच्या वाढदिवसानिमित्त सहेलीच्या सदस्यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांनी मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. यावेळी आश्रमाच्या संचालिका कमलाबेन गादिया, संजय शहा, सनल शहा, योगिता शहा, प्राईड सहेलीच्या जिग्ना शहा, दीपा बडीगेर, रिया सिंग, रुपा मंगावती, अश्विनी रोकडे आदी उपस्थित होत्या.