सावंतवाडी : प्रतिनिधी
पुंडलिक दळवींच्या वाढदिवसाचे औचित्य
सावंतवाडी नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही .त्यामुळे या कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या वाढदिवसाच्या ओचित्य साधून त्यांना धान्य स्वरूपात मदत केली आहे शुक्रवारी दळवी यांची कन्या श्रिया दळवी हीच्या हस्ते हे धान्य वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिदायतुल्ला खान बावतीस फर्नांडिस उपस्थित होते.
सफाई कामगारांचे महिन्याचे वेतन झालेले नसून सुद्धा सावंतवाडी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने सावंतवाडी सफाई कर्मचाऱ्यांनी एक दिवस काम बंद आंदोलन करून सावंतवाडी शहरातील नागरिकांना वेठीस न धरण्याच्या विनंतीला मान देऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत सफाई कर्मचारी आर्थिक टंचाई असून त्यांना आपला चरित्र चालवणे देखील कठीण झालेले आहे सफाई कामगार सावंतवाडी शहराचे रियल हिरो यांना एक थोडासा हातभार द्यावा या उद्देशाने त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दळवी यांनी केले.