क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसाइटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालय आणि जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विमानाने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन 13 ते 15 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयातर्फे 13, 14 आणि 15 रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक विभागानुसार विजेत्या स्पर्धकांना आकर्षक असा चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धा नियोजन, 13 रोजी शालेय विद्यार्थी इयता पहिली ते चौथी, आणि पाचवी ते सातवी अशा गटात स्पर्धा होणार आहेत. 14 रोजी हायस्कूल, पदवीपूर्व महाविद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 रोजी सर्व वयोगटासाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांची निवड विभागाप्रमाणे करून पारितोषिक देण्यात येतील. तसेच प्रत्येक विभागातील दहा स्पर्धकास उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.
या स्पर्धेसाठी जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रध्यापक डी. डी. राव हे स्पर्धा संयोजक तसेच बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी गिरीष बाचीकर, कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्रा. अनिल खांडेकर स्पर्धा आयोजनाचे नियोजन करत आहेत. प्राचार्य प्रणव पीत्रे यांनी बेळगाव जिल्हा अंतर्गत सर्व स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपली नावनोंदणी खालील क्यूआर कोडच्या माध्यमातून करावे.