वार्ताहर /किणये
कडोली येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या मुला-मुलींच्या थ्रो-बॉल संघांनी प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही संघांची जिल्हापातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुलांच्या संघामध्ये ओमकार हावळ, विशाल पाटील, वैभव कणबरकर, प्रथमेश उसुलकर, आदर्श बेळगावकर, मनिष लाड, सर्वेश कदम, निरंजन पेडणेकर, स्वयंम कणबर्गी, कुणाल पाटील, अनिकेत काकतकर, प्रथमेश कलखांबकर यांचा तर मुलींच्या संघामध्ये अर्पिता जैनोजी, मधुरा लाड, सर्वज्ञा लाड, गायत्री चौगुले, निकिता हुंदरे, मधुरा सुळगेकर, विमल खन्नुकर, धऩश्री घगवे, ज्योती कणबरकर, लक्ष्मी सांडीम, विनया पाटील, साक्षी जाधव यांचा समावेश आहे.
वैयक्तिक खेळात कुस्तीमध्ये शुभम चौगुलेने प्रथम, वैभव कणबरकर कराटेमध्ये प्रथम, अर्पिता जैनोजी कराटेमध्ये प्रथम, सीमा पासवानने कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. मुख्याध्यापक एस. बी. पाटील, क्रीडा शिक्षक जे. डी. बिर्जे व टीम मॅनेजर ए. पी. नाकाडी आदींचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.