बेळगाव : बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. विविध गटात जवळपास 100 हून अधिक बॅडमिंटनपटूंनी सहभाग घेतला आहे. महाबळेश्वर नगर येथील बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या बॅडमिंटन कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा बॅडमिंटने संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, अभय हार्दी, मनोज पाटील, एन. व्ही. मंथेरो, एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते बॅडमिंटन नेटवरील फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॅडमिंटन संघटनेच्या कोर्टवर खेळविण्यात आलेल्या 13 वर्षाखालील मुलींच्या एकेरीत अर्ना वि.वि. अवनी टी. 30-13, सचित टी. वि. वि. सानवी डी. 30-4, जान्हवी वि. वि. चतुर्या 30-14, श्रावणी वि. वि. नियती 30-4, अल्ड्राना वि. वि. आर्या 30-5, अर्ना वि. वि. आर्या 30-16, अनिका वि. वि. श्रेया 30-10, निकिता वि. वि. आकांशा 30-12. मुलांच्या गटात : आदित्य वि. वि. अजिंक्य 30-18, सोहम वि. वि. यशस 30-28, अवनीश वि. वि. हर्षवर्धन 21-15, वेदांत वि. वि. इशान 30-28, समन्य वि. वि. सवनत 28-20, अभिलाश वि. वि. वेदांत 30-21, नमन वि. वि. यज्ञा 30-10 यानी विजेतेपद पटकाविले. 13 वर्षाखालील मुलांच्या एकेरीत अखिलेश वि. वि. अभिजित 30-23, विराज वि. वि. समर्थ 30-29, अनंत वि. वि. देव 30-21, विहान वि. वि. शिवनेश 30-20, स्वस्तिक वि. वि. वैभव 30-22. 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरीत सृष्टी वि. वि. प्रतिक्षा 30-28, बनश्री वि. वि. जान्हवी 30-17, तनवी वि. वि. सिमरन 30-10, साक्षी वि. वि. अर्ना 30-6, स्वानिनी वि. वि. सानवी 30-12, मंदिरा वि. वि. अक्षरा 30-15, गेहना वि. वि. जुही 30-16. मुलांच्या गटात : माहिम वि. वि. श्रेष्ठ 30-5, अभिजित वि. वि. तेजस 30-17, समर्थ वि. वि. अखिलेश 30-17, नक्षत्र वि. वि. ध्रुव 30-14, नमन वि. वि. श्रेयश 30-12, अर्णव वि. वि. वीर 30-27, यश वि. वि. बिलाल 30-8, तोषण वि. वि. आर्यन 30-15, ऋशंक वि. वि. ओम 30-15, समर्थ वि. वि. विराट 30-15, वेद वि. वि. गणेश 30-16, तनुष वि. वि. रितांश 30-8, साई वि. वि. अथर्व 30-10, वेदांत वि. वि. मयांक 30-17, आर्यमन वि. वि. शौर्य 30-15 असे विजयी मिळविले. शनिवारी दुसऱ्या फेरीतील सामने तर रविवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.