क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱया 38 व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा रोलर स्केटींग संघटनेची स्पर्धा व निवड चाचणी मोठय़ा उत्साहात पार पडली.
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 16 वी जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी रिंक रेस केएलई सोसायटी स्केटिंग रिंक, लिंगराज कॉलेज व रोड रेस येडियुराप्पा मार्ग जुना पीबी रोड बेळगाव येथे झाली. स्केटिंगचे इतर प्रकार ड्रीम्झ स्केटिंग रिंक श्रींगारी कॉलनी बेळगाव येथे घेण्यात आले. या चॅम्पियनशिप आणि निवड चाचणीमध्ये 160 स्केटर्स सहभागी झाले होते.
या चॅम्पियनशिपच्या उद्घाटन समारंभास जिल्हा युवा व सबलीकरण क्रीडा अधिकारी जिनेश्वर पडनाड, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे निरीक्षक ख.संतोष श्रींगारी, निरंजन बाबू, झुब्बीउल्ला, लालू बडीवाले, तुकाराम पाटील, तुकाराम शिंदे, पालक उपस्थित होते.
निकाल ः स्पीड क्वाड स्केटिंग-5 ते 7 वर्षे मुले-शिवाय पाटील 1 सुवर्ण, 1 कांस्य, रेयांश काकतकर 1 रौप्य, 1 कांस्य, वर्धमान जक्कण्णावर 1 कांस्य, वीर मोकाशी 2 सुवर्ण, अन्वीत शिंगाडी 2 रौप्य, मुली-दियांका पाटील 2 सुवर्ण, अनन्या पाटील 2 रौप्य, द्रिती वेसणे 1 रौप्य, 1 कांस्य. 7 ते 9 वर्षे मुले-आर्या कदम 3 सुवर्ण, अवधूत मोरे 3 रौप्य, समीध कनगली 1 कांस्य, सार्थक चव्हाण 1 सुवर्ण, 2 कांस्य, ऋषिकेश बोरे 1 रौप्य, रचित नांगरे 1 कांस्य, मुली-आराध्या पी. 3 सुवर्ण, प्रांजल पाटील 1 सुवर्ण, 2 रौप्य, दुर्वा पाटील 2 रौप्य, 1 कांस्य, रुत्रा दळवी 3 कांस्य.
9 ते 11 वर्षे मुले-जियानाली तांबोळी 3 सुवर्ण, कुलदीप बिर्जे 3 रौप्य, सर्वेश पाटील 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य, पार्थ कलुटगी 1 कांस्य, विवेक दोडबंगी 2 कांस्य, मुली-आराध्या मोरे 3 सुवर्ण, उत्प्रेक्षा नवलाई 1 सुवर्ण, 2 रौप्य, खुशी अगसीमणी 1 रौप्य, 2 कांस्य, समिक्षा बडोगिया 1 रौप्य, 1 कांस्य, संचिता बोरे 1 कांस्य. 11 ते 14 वर्षे मुले- सत्यम पाटील 1 सुवर्ण, 2 कांस्य, सौरभ साळोखे 3 सुवर्ण, भव्य पाटील 2 रौप्य, 1 कांस्य, श्रेयश सुंदळे 1 कांस्य, कृष्णा बस्तवाडी 2 कांस्य, मुली-अनघा जोशी 2 सुवर्ण, 1 रौप्य, जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, 1 रौप्य. सान्वी इटगीकर 2 रौप्य, 2 कांस्य, प्रकृती पोळ 1 रौप्य. 14 ते 17 वर्षे मुले- साई समर्थ अजाना 1 सुवर्ण, 2 रौप्य, तेजस पाटील 1 रौप्य, 2 कांस्य, श्री रोकडे 3 सुवर्ण, मुलीöविशाखा फुलवाले 3 सुवर्ण, सानिका कंग्राळकर 1 रौप्य, 2 कांस्य, साक्षी रामनकट्टी 1 सुवर्ण, 2 रौप्य. 17 वर्षावरील मुले-साईश वडर 3 सुवर्ण, मुली-श्रेया वाघेला 3 सुवर्ण, शिवानी वाघेला 1 सुवर्ण, 2 रौप्य. या सर्व खेळाडूंना सूर्यकांत हिंडलगेकर योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, अजित शिलेदार, विठ्ठल गगणे, मंजुनाथ मंडोळकर, सूरज शिंदे, अनुष्का शंकरगौडा, विशाल वेसणे, श्रीमान भिवसे, सोहम हिंडलगेकर, सागर चौगुले यांनी निवड चाचण्यांचे आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.