वृत्तसंस्था/ मेसन, अमेरिका
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचला 2021 नंतर अमेरिकेत पहिल्यांदाच पराभव स्वीकारावा लागला. येथे सुरू असलेल्या वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत निकलास कॅसिचसमवेत खेळताना जेमी मरे व मायकेल व्हीनस यांच्याकडून पराभूत झाला.
मरे-व्हीनस यांनी जोकोविच-कॅसिच यांच्याव 6-4, 6-2 अशी सहज मात केली. कोव्हिड 19 लसीकरणाच्या निर्बंधामुळे जोकोविच 2021 नंतर जोकोविच प्रथमच अमेरिकेत खेळत होता. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत त्याला कार्लोस अल्कारेझकडून पराभव स्वीकाराव लागला होता. त्यानंतर तो प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला होता. एकेरीत तो सलामीचा सामना अलेजान्द्रो डेव्हिडोविच फोकिनाविरुद्ध खेळणार आहे.
महिला विभागात अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सने 2019 नंतर प्रथमच या स्पर्धेत एकेरीची तिसरी फेरी गाठली असून तिने सहाव्या मानांकित व विद्यमान विज्sात्या कॅरोलिन गार्सियाचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव केला. पाचव्या मानांकित ऑन्स जेबॉरने तिसऱ्या सेटमध्ये 5-1 ची पिछाडी भरून काढत अॅनहेलिना कॅलिनानवर 6-3, 6-7 (2-7), 7-6 (7-2) अशी मात केली.