अहवालामधून माहिती सादर
नवी दिल्ली
देशातील लोक खरेदीसाठी ईएमआयला प्राधान्य देत आहेत. लोक रोख, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड किंवा युपीआयऐवजी ईएमआय कार्डच्या आधारावर (भारतीय कर्ज घेऊन खरेदीला प्राधान्य देतात) वापरण्यास प्राधान्य देत आहेत. एका सर्व्हेमधून ही गोष्ट समोर आली आहे.
प्राप्त अहवालानुसार, होम क्रेडिट इंडियाच्या वार्षिक ग्राहक अभ्यास ‘हाऊ इंडिया बॉरोज’मध्ये हे उघड झाले आहे. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पाटणा आणि रांचीसह 16 शहरांमध्ये भारतात हा सर्व्हे करण्यात आला आहे. भारतात कसे कर्ज घेतले जाते हे पाहण्यासाठी 2022 मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्वेक्षणानुसार, भारतातील 50 टक्केपेक्षा जास्त लोक खरेदीसाठी झटपट पेमेंट करण्याऐवजी ईएमआय कार्ड किंवा कोणतेही क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. लक्षात घ्या की इएमआय हा समान मासिक हप्ता आहे. यामध्ये, कोणत्याही खरेदीचे संपूर्ण पेमेंट मासिक हप्त्यांमध्ये केले जाते.