वय केवळ 41 वर्षे : गुजरातच्या जामनगरमधील घटना
► वृत्तसंस्था / जामनगर
प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर गौरव गांधी (41 वर्षे) यांचे निधन झाले आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर गांधी यांना मंगळवारी संध्याकाळी छातीत वेदना सुरू झाल्या होत्या, त्यांच्यावर रुग्णालयात त्वरित उपचार करण्यात आले होते, त्यानंतर प्रकृती सुधारल्याचे वाटल्याने ते घरी परतले होते.
दोन तासांनी ते घरातील बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन कोसळले होते. रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. गांधी यांनी स्वत:च्या वैद्यकीय कारकिर्दीत 16 हजारांहून अधिक हार्ट सर्जरी केल्या होत्या. गुजरातच्या जामनगर येथील जी जी रुग्णालयात ते कार्यरत होते. डॉक्टर गांधी यांच्या निधनामुळे वैद्यकीय जगतालाही मोठा धक्का बसला आहे.