सुदीप ताम्हणकर : सरकारकडून कुणावरही अन्याय होणार नाही
पेडणे : सरकारने टॅक्सी व्यवसायिकांसाठी मोपा विमानतळावर 9 जून ते 15 जून या दरम्यान टॅक्सी परवाने देण्याचे जाहीर केले आहेत. याबाबत सध्या टॅक्सी बांधवांमध्ये घोळ आणि गैरसमज निर्माण झाला आहे. मात्र याबाबत सरकारकडून कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे टॅक्सी व्यवसायिक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ज्यावेळी सरकारने 5 जानेवारी 2023 या दरम्यान जाहिरात देऊन सरकारने सरकारी अर्ज दिले होते ते त्यावेळी ज्यांनी अर्ज भरले तसेच पीसीओपीए अर्ज सादर केले आणि ज्याच्याकडे त्यादरम्यान गाडी होती तसेच गाडीचा परवाना म्हणजेच बॅच होता, त्यांना पुन्हा 9 जून ते 15 जून या दरम्यान अर्ज भरण्यास मुभा आहे. ते अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली. मात्र अनेक टॅक्सी बांधवांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे त्या दरम्यान गाडी किंवा बॅच नव्हता अशांनी जे अर्ज भरलेले आहेत ते अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्या अर्जांची छाननी झाल्यानंतर ते अर्ज बाहेर पडणार असल्याचे सुदीप ताम्हणकर म्हणाले. ज्यावेळी सरकारने सरकारी अर्ज जाहीर केले होते ते अर्ज अनेकांनी त्यावेळी भरले होते, मात्र काही जणांकडे गाड्या तसेच गाडीचा परवाना बॅच नव्हता. आता 9 जून ते 15 जून या दरम्यान हे अर्ज भरण्यासाठी सरकारने अवधी दिला आहे. पूर्वी भरलेले आणि पीसीओपीए अर्ज भरले होते त्यांना ते अर्ज पुन्हा भरण्याची मुभा आहे, असे सुदीप ताम्हणकर यांनी सांगून याबाबत कुणावरही अन्याय होणार नाही जे कायदेशीर आणि वाहतूक नियमाला धरून आहे. त्यांना विमानतळावर रोजगार आणि व्यवसाय करण्यासाठी संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.