बेळगाव : मध्यप्रदेश येथे अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने दुहेरी मुकुट संपादन केला. या दोन्ही संघाची 67 व्या एसजीएफआयच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्वालियर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर संत मीरा शाळेच्या मुलींच्या संघाने दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. प्राथमिक मुलींच्या गटात उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने नैनिताल स्कूल उत्तर क्षेत्रचा 1-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या दीपिका रेंगने एकमेव गोल केला, अंतिम लढतीत संत मीरा शाळेने मानसा स्कूल पंजाब पश्चिम उत्तरक्षेत्रचा टायब्रेकरवर 2-1 असा पराभव केला. विजयी संघाच्या किर्तीका लोहार, श्रद्धां लकण्णावर यांनी प्रत्येकी 1 गोल ,तर पराभूत संघातर्फे मानसा हिने 1 गोल केला. संतमीरा संघात गोलरक्षक आकांक्षा बोकमुरकर, अंजली चौगुले, स्नेहा बोंगाळे, श्रेया लाटुकर, चरण्या मंजुनाथ, दीपा बिडी ,ऐश्वर्या शाहपुरमठ, किर्तिका लोहार, समीक्षा खन्नुरकर, राधा धबाले, प्रीती कडोलकर, श्रद्धा लक्कन्नावार, दिपीका रेंहाग, मोनित रेहांग, संचिता रेंहाग, हर्षदा जाधव, लक्ष्मी सैदत्ती, निधीशा दळवी यांचा समावेश होता.
माध्यमिक मुलींच्यात गटातील उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने उत्तर क्षेत्रचा 1-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या कर्णधार प्रीती भांदुर्गेने 1 गोल केला. अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने सीनियर सेकंडरी हायस्कूल मथुरा पश्चिम उत्तर क्षेत्राचा 1-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या कर्णधार प्रीती भांदुर्गेने एकमेव विजयी गोल केला. संतमीरा संघात प्रीती भांदुर्गे, प्रियांका पाटील, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, चैत्रा इमोजी, संस्कृती भंडारी, स्नेहा पाटील, राशी असलकर, जिया बाचीकर, भूमिका कुलकर्णी, कीर्ती मुरगोड, रेनिवार मालशोय, खोबोरोज मालशोय, अवम्रिता मालशोय, चांडोरुंग मचास, ओरीना वैरेन, केजोंती ब्रू, सान्वी पाटील यांचा समावेश होता. या खेळाडूंना सी. आर. पाटील, योगेश सावगांवकर, चंद्रकांत तूर्केवाडी, धनश्री पाटील, वीणाश्री तुक्कार बसवंत पाटील, मयुरी पिंगट यांचे मार्गदर्शन तर परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, माधव पुणेकर, राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे. पटना बिहार येथे माध्यमिक मुलींचे तर झारखंड रांची येथे प्राथमिक मुलींच्या अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी हे संघ पात्र ठरले आहेत.