कॅम्प विभागीय क्रीडा स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व वनिता इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित कॅम्प विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत मुला, मुलींच्या गटात सेंट झेवियर्स संघाने सेंट पॉल्स व मुलींच्या गटात मराठी विद्यानिकेतन संघाचा पराभव करुन दुहेरी मुकुट मिळविला.
मराठी विद्यानिकेतन मैदानावर कॅम्प विभागीय माध्यमिक हॅन्डबॉल स्पर्धेत संपूर्ण विभागातून सहा मुलांच्या तर 4 मुलींच्या संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. निर्मला तुनात यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स संघाने कॅन्टोन्मेंट संघाचा 2-1 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे आना मस्केवाले व अलिशा ब्रोजीस यांनी गोल केले तर कॅन्टोन्मेंटतर्फे अफसानाने एकमेव गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात मराठी विद्यानिकेतन संघाने एमव्हीएम संघाचा 3-1 असा पराभव केला. विद्यानिकेतनतर्फे सरोजनीने 2 तर आशाने 1 गोल केला. एमव्हीएमतर्फे निलमने एक गोल केला. अंतिम सामना सेंट झेवियर्स व मराठी विद्यानिकेतन यांच्यात झाला. या सामन्यात सेंट झेवियर्स संघाने मराठी विद्यानिकेतनचा 4-1 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे आना मस्केवाले 3 गोल नोंदवत हॅटट्रीक साधली तर आलिशा ब्रोजेसने 1 गोल केला. मराठी विद्यानिकेतनतर्फे सरोजनीने एक गोल केला.
मुलांच्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल्सने कॅन्टोन्मेंट संघाचा 2-0 असा पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे गौरेश व जोसवा यांनी प्रत्येकी एक गोल केला तर कॅन्टोन्मेंटतर्फे बंदुकवालेने एक गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने विद्यानिकेतनचा 4-1 असा पराभव केला. सेंट झेवियर्सतर्फे मयुरेश जाधवने 3 तर रियानने 1 गोल केला. मराठी विद्यानिकेतनतर्फे अभिषेकने 1 गोल केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने सेंट पॉल्स संघाचा 2-1 असा पराभव करीत अंजिंक्मयपद पटकाविले. झेवियर्सतर्फे मयुरेश जाधवने 2 तर सेंट पॉल्सतर्फे गौरेशने 1 गोल केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे स्पर्धासचिव नागराज भगवंतण्णावर, ऍन्थोनी डिसोजा, प्रकाश बजंत्री, दत्ता पाटील, महेश हागिदाळे, मानस नायक, चेस्टर रोजारीओ व संजय चार्ल्स यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.