गुहागर प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी यांचे चिरंजीव, गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊन गोरगरीब रुग्णांकरिता आधारवड ठरलेले डॉ. शंतनू जोशी, नरवण यांचे सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले. डॉक्टर अनिल जोशी यांच्याप्रमाणेच त्यांचे चिरंजीव डॉक्टर शंतनु जोशी यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रुग्णसेवा दिली आहे. त्यांना काही दिवसापूर्वी ताप आल्याने उपचाराकरिता डेरवण येथे दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीही योग्य निदान होत नसल्याने त्यांना पुणे येथील मंगेश कर हॉस्पिटलमध्ये अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते उपचार घेत असताना त्यांना हृदयविकाराचा आघात असल्याने यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांची अंतयात्रा नरवण येथून आज मंगळवार दि.26 सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता निघणार आहे.