अरिहंत हॉस्पिटलमध्ये होणार तपासणी, लठ्ठपणा, वजन कमी करण्यासाठी देणार उपचार
प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्थुलत्व निवारणतज्ञ डॉ. सुरेंद्र उगाळे हे सोमवार दि. 28 रोजी सकाळु 9 ते दुपारी 1 यावेळेत बेळगावमधील अरिहंत हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत आहेत.
आजच्या आधुनिक जगात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच अवेळी आहाराचे सेवन, योग्य झोप नसणे, व्यसन आदींमुळे लठ्ठपणा, वजन वाढणे व मधुमेहासारखे रुग्ण सध्या वाढत आहेत. 30 वर्षांचा अनुभव असलेले डॉ. सुरेंद्र उगाळे हे अलूरियम प्रक्रियेद्वारे लठ्ठपणा व वजन कमी करण्यात अग्रणी आहेत. जगात अशाप्रकारे 50 हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अलूरियम ही प्रक्रिया एका फुग्याद्वारे (पोटात सोडणे) केली जाते. या अंतर्गत वजन कमी होण्यास मदत होते.
डॉ. सुरेंद्र उगाळे यांना चयापचय व प्रगत लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रियांमध्ये अग्रणी मानले जाते. त्यांनी जर्मनी, अमेरिका, ब्राझीलमध्ये प्रशिक्षण घेऊन अनेक डॉक्टरांनाही प्रशिक्षित केले आहे. डॉ. उगाळे यांनी आतापर्यंत 25000 हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. डॉ. सुरेंद्र उगाळे हे टाईप-2 मधुमेहासाठी लॅप्रोस्कॉपिक इलियल इंटरपोजिशन प्रक्रिया सुरू करणारे दुसरे शस्त्रचिकित्सक असून त्यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर डॉ. उगाळे हे लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया सुरू करणारे दक्षिण भारतातील पहिले डॉक्टर आहेत.
डॉ. सुरेंद्र उगाळे यांनी 1981 मध्ये टोपीवाला राष्ट्रीय मेडिकल कॉलेज व डॉ. बी. वाय. एल. चॅरिटेबल हॉस्पिटलमधून एमबीबीएस पदवी घेतली आहे. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 1985 मध्ये एमएस पदवी घेतली आहे. याचबरोबर त्यांनी प्रगत लॅप्रोस्कॉपिक शास्त्रक्रियेसह मेटाबोलिक व बेरियाट्रिकमध्येही फेलोशिप केली आहे.
डॉ. उगाळे यांनी मधुमेह तीव्रता स्कोअर विकसित केला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील केंद्रांमध्ये त्यांनी प्रॉक्टर (शिस्त अधिकारी) म्हणूनही सेवा बजावली आहे. तसेच डॉ. उगाळे यांनी 4 पुस्तकांमध्ये लेख असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी पेपर सादर केले आहेत. त्यांचे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 33 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
डॉ. उगाळे हे विविध मेडिकल क्षेत्रातील अनेक संस्थांचे संचालक असून त्यांचे अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. डॉ. उगाळे यांनी आपल्या 30 वर्षांच्या अनुभवातून लेप्रोस्कॉपिक ही शस्त्रक्रिया भारतासह अनेक देशांमध्ये पसरविली आहे. लठ्ठपणा, वजन कमी करणे व मधुमेह असणाऱया रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.