महाद्वार रोड कपिलेश्वर कॉलनीत स्मार्ट सीटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
बेळगाव : स्मार्ट सिटीचा गाजावाजा करून बेळगाव शहरात अनेक कामे सुरु करण्यात आली. मात्र, अद्याप हि कामे अर्धवट स्थितीत असून महाद्वार रोड कपिलेश्वर कॉलनीत एक महिन्यांपासून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ड्रेनेज वाहिन्यांमधील सांडपाणी नागाfरकांच्या घरात शिरले असून महानगरपालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
कपिलेश्वर कॉलनीत रस्त्याची खोदाई करून माfहना उलटला आहे. या रस्त्याची खोदाई करताना माती गटांरिंमध्ये टाकण्यात आली. त्यामुळे गटारीमधून सांडपाण्याचा निचरा होत नाहि. सांडपाणी साचून राहिल्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच या कामामुळे नळांना येणारे पिण्याचे पाणीही बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. कॉलनीत अनेक दिवसांपासून वीजही गायब आहे.
येथील ड्रेनेज वाहिन्या ब्लॉक होऊन सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचे किळसवाने प्रकार घडत आहेत. दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे.
जून महिन्यात शक्यतो रस्ता खोदाईची कामे करता येत नाहित. सध्या पावसाला विलंब झाला असला तरी येत्या 48 तासात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, 48 तासांत काfपलेश्वर कॉलनीतील काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे या कॉलनीतील नागरिकांना आता चिखलाचाही सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या परिसराची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.