पणजी : अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) मोरजी येथे केलेल्या कारवाईत 2 लाख 60 हजार ऊपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात एका स्थानिक युवकाला अटक केली असून, त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्ह नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयीताचे नाव समीर सोपटे, (35 मांद्रे) असे आहे. संशयीत ड्रग्ज व्यवसायात असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. पोलीस गेले काही दिवस त्याच्यावर नजर ठेऊन होते. रविवारी पहाटे ड्रग्ज विक्री करण्यासाठी संशयीत मोरजीत येणार असल्याची माहिती मिळाताच पोलिसांनी सापळा रचून संशयीताला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 25 ग्रॅम मेटाएम्फाटामाईन व 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच तो ज्या स्कूटरवरून मोरजीत आला होता ती स्कूटरही जप्त करण्यात आली आहे. एएनसीचे उपनिरीक्षक रोहन मडगावकर, हवालदार प्रमोद कळंगुटकर, कन्स्टेबल नितेश मुळगावकर, सुमित मुटकेकर व साईराज नाईक यांनी एएनसी निरीक्षक सजीथ पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली आहे. एएनसीचे उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकेर व अधीक्षक शिवेंदू भूषण (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली महिला उपनिरीक्षक प्रियांका गारूडी पुढील तपास sकरीत आहेत.
Previous Articleश्रीगणेशा धडा घातला मला पंतजीनी..!
Next Article सांकवाळ राधाकृष्ण मंदिराकडे अपघाताचा धोका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.