दोन तस्करांवर रंगेहाथ कारवाई
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूमधील रामबन पोलिसांनी दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 300 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. आरोपींना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
रामबन पोलिसांनी बनिहाल रेल्वेचौक येथे एक वाहन थांबवून सुमारे 30 किलो कोकेन जप्त केले. या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 300 कोटी ऊपये आहे. या कारवाईवेळी दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे सापडलेली रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी सांगितले. संबंधितांवर एनडीपीएस कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.