ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील खेड शिवापूर टोलनाका आणि लोणावळ्याजवळ 5 कोटींचे 1 किलो 50 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
29 मे रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर एका वाहनातून 850 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. हे मेथॅम्फेटामाइन आरोपींनी कुठून आणले होते आणि ते कोणाला विकणार होते यासंदर्भात पुणे पोलीस तपास करत आहेत.