फोंडा : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघा बिगरगोमंतकीय युवकांना फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. बुधाराम बिलबराम बिश्नोई (56, मूळ राजस्थान), जगदीश कोजारामजी बिश्नोई (46, मूळ राजस्थान) अशी त्याची नावे आहेत. त्यांच्याकडून 145.21 ग्रॅम वजनाचा सुमारे साडेचौदा लाख रूपये किमतीचा एमडीएमए अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी उशिरा रात्री फर्मागुडी-फोंडा येथील एका हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही संशयित फर्मागुडी फोंडा येथील नेचर पॅराजाईड हॉटेलजवळ अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. दोघांही संशयितांकडून 96.66 ग्राम व 48.55 ग्राम मिळून 145.21 ग्रॅम वजनाचा एमडीएमए अंमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर, नितेश काणकोणकर, हवालदार केदारनाथ जल्मी, अमेय गोसावी, सुरज गावडे, किरण लोंडे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांही संशयितांविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Previous Articleकुंडई येथे फुटली जलवाहिनी
Next Article मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.