न्हावेली / वार्ताहर
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्यासाठी ३५ कोटीची गरज आहे.सद्यस्थितीत रेल्वेकडे निधीच नाही.त्यामुळे सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न सद्यातरी अधांतरीच राहण्याची शक्यता आहे,अशी भिती खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.दरम्यान लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत अनेकजण चर्चा करीत आहेत. परंतु कोण येथील ते निवडणुकीच्यावेळी पाहू. तुर्तास तरी मला मतदारसंघात काम करायचे आहे.असे त्यांनी सांगितले. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तळगाव निवासस्थानी असलेल्या श्री.राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment