बेळगाव प्रतिनिधी – आमदार अनिल बेनके आयोजित दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महिला विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या गायन स्पर्धेत जवळपास 300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. छोट्या गायकांनी गायलेल्या सुंदर गीतांमुळे उपस्थित रसिकांची मने जिंकली, मराठी गीताप्रमाणेच कन्नड गीतांचाही स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. ही स्पर्धा ३री ते ५वी , ५वी ते ७ वी शालेय विद्यार्थ्यांसाठी व माध्यमिक तसेच महाविद्यालय स्पर्धकांसाठी घेण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजश्री हिरेमठ, प्रतिभा कळ्ळीमठ, सरोज निशांदार यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ९ ऑक्टोंबर रोजी सरदार मैदानावर होणार आहे.
Previous Articleदोन ‘छोटे’ पोलीस जाळय़ात, अजून दोघे रडारवर
Next Article डेल कंपनीचा लॅपटॉप-कम-टॅबलेट दाखल
Related Posts
Add A Comment