नोकरीपेक्षा हे काम अधिक पटीने चांगले
डेविन मॅकक्लाउड नावाच्या मॉडेलने टिकटॉकवर स्वतःविषयी सांगत आपण केवळ पायांची छायाचित्रे शेअर करून चांगली कमाई करत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर या कामातून 9-5 या वेळेतील नोकरीपेक्षा अधिक चांगले जीवन जगत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय डेविन मॅकक्लाउड डान्सर आणि फूट मॉडेल आहे. ती स्वतःच्या पायांची छायाचित्रे विकून पैसे कमाविते, तिचा हा जॉब अत्यंत विचित्र असला तरीही ती याबद्दल समाधानी आहे.
डेविनच्या या टिकटॉक क्लिपला 13 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. फूट मॉडेलच्या व्यवसायात कशाप्रकारे पैसे कमावता येतात हे तिने यात सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर एक पेज केवळ आणि केवळ स्वतःच्या पायांच्या छायाचित्रांसाठी तयार केले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर पायांमध्ये घातलेले सुंदर पैंजण आणि स्वच्छ अंगठा तसेच बोटं प्रत्येकाला आकर्षित करत असतात असे तिने नमूद केले आहे.
पायांची छायाचित्रे विकून पैसे कमाविता येणाऱया वेबसाइट्सची नावेही तिने सांगितली आहेत. डेविनचे टिकटॉकवर 45 हजार फॉलोअर्स असून ते तिच्या छायाचित्रांना पसंत करत असतात. या प्रोफेशनमध्ये आपणच बॉस असून केवळ स्वतःचे पाय सुंदर ठेवण्याची गरज असते असे तिचे म्हणणे आहे.