वृत्तसंस्था/ जकार्ता
पूर्व इंडोनेशियामध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 6 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. या आपत्तीमध्ये अद्याप कोणतीही मोठी पडझड किंवा जीवितहानी झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांतात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे हवामानशास्त्र आणि जिओफिजिक्स एजन्सीने सांगितले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार रविवारी दुपारी 12:52 वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू मेंबरमो राया रीजन्सीच्या नैर्त्रुत्येस 58 किमी अंतरावर आणि जमिनीखाली 10 किमी खोलीवर होता.