वृत्तसंस्था/ शिलाँग
ईशान्येकडील राज्य मेघालयात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी होती. सोमवारी सकाळी 6.32 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र तुरा येथे होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घरातून बाहेर धाव घेतली होती. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची जीवित तसेच आर्थिक हानी झालेली नाही.
यापूर्वी रविवारी रात्रीही मेघालयात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. चेरापूंजी येथे रात्री 8.37 वाजता 3.8 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. चेरापूंजीपासून 19 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. 11 जून रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.