पुणे : रासायनिक रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन ‘लोकमान्य’ सोसायटीतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमान्य’ सोसायटीच्या शहरातील शाखा व विविध शाळांमधून आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती घडविण्याचे कौशल्य आत्मसात केले व आपल्या घरातील गणेशोत्सव मूर्तीची निर्मिती केली. गणेशमूर्ती निर्मिती प्रक्रियेचा सर्वांनी घेतला आनंद या प्रशिक्षण कार्यक्रमात शाळांमधून विद्यार्थ्यांचे पालक व ‘लोकमान्य’ सोसायटीच्या शाखांमधून सभासद, ठेवीदार व नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. या गणेशमूर्ती निर्मिती प्रक्रियेचा सर्वांनी आनंद घेतला.
विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे यासाठी उपक्रम
अनेक वेळा गणपती मूर्तीची निर्मिती करताना शाडू ऐवजी अशा साहित्याचा वापर केला जातो की, विसर्जनानंतर त्या मूर्ती विरघळत नाहीत. यामुळे आपल्या देवतांची अवहेलना होते. ती गोष्ट लक्षात घेवून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती आग्रहाने व्हावी व ते कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, या उद्देशाने ’लोकमान्य सोसायटी’ने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी सांगितले.