ऑनलाईन टीम/तरुण भारत
coal scam case : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना कोळसा चोरी घोटाळ्या प्रकरणी चौकशीसंदर्भात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी समन्स बजावले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (ED issues summons to TMC’s Abhishek Banerjee in West Bengal coal scam case)
कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशीसाठी आज समन्स बजावले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता (CM Mamata Banerjee) बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने शुक्रवारी सकाळी त्यांच्या कोलकाता कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा : आसारामबापूंच्या ५ हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा
ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अभिषेक बॅनर्जी यांना आमच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. नवी दिल्लीहून आमचे अधिकारी त्याची चौकशी करण्यासाठी येतील.” तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आणि केंद्रीय एजन्सी त्यांच्या पुतण्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांना नोटीस पाठवू शकतात असा आरोप केला होता.