ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ईडीने गुंतवणूक घोटाळा आणि पीएमएलए 2002 प्रकरणात पंकज मेहदिया यांच्याशी संबंधित मुंबई आणि नागपुरातील 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. छापेमारीदरम्यान 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
गुंतवणूक घोटाळ्यासंदर्भात पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद कील, प्रेमलता नंदलाल मेहदिया यांच्याविरुद्ध नागपूर सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे पीएमएलए चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणात ईडीने 15 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आतापर्यंत 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
अधिक वाचा : सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ