सावंतवाडी प्रतिनिधी
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याची तब्बल चार वर्षानंतर राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर असले तरी त्यांच्या जागी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे कोल्हापूरचे ध्वजारोहण करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ध्वजारोहणाच्या माना ऐवजी ठाणे जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ध्वजारोहण केले होते . त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. आणि पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची वर्णी लागली. त्यानंतर श्री केसरकर यांना अडीच वर्ष आमदार म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहावे लागले. मात्र त्या घडामोडीनंतर गतवर्षी शिवसेनेमध्ये फूट पडून नेते एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या मंत्रिमंडळात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांची वर्णी लागली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचे ध्वजारोहणाचे स्वप्न अधुरे राहिले होते. आता तब्बल चार वर्षानंतर श्री केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान प्राप्त झाला आहे. मंत्री केसरकर येत्या 15 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा निहाय ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आणि तसा आदेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री केसरकर येत्या 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
Previous Articleपुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणणार : नितीन गडकरी
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment