ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Eight crore fake notes seized in Thane ठाण्यात गुन्हे शाखेने तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पालघरमधील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
राम शिंदे आणि राजेंद्र राऊत अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील दोघांकडे दोन हजारांच्या बनावट नोटांचे घबाड असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट पाचने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजारांच्या बनावट नोटांचे 400 बंडल जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या नोटांचे बाजारमुल्य आठ कोटी रुपये आहे. या सर्व बनावट नोटा आरोपी बाजारात चलनात आणणार होते. पण त्यापूवीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अधिक वाचा : पाटलांच्या पोरांना लग्नाआधी पोरं, राजन पाटील यांची जीभ घसरली
आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (ए), 489 (ब), 489 (सी) आणि 34 अन्वये गमोहन कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलीस शोध घेत आहेत. बनावट नोटांचे हे मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.