सावंतवाडी प्रतिनिधी
एज्युकेटर एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क ई . जी एन या आंतरराष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल संस्था प्रमुख एडवोकेट रुजूल पाटणकर यांना इमर्जिंग एज्युकेशन हिरो अवॉर्ड 2023 प्रदान करण्यात आला आहे. मुंबई येथील रेडिसन ब्ल्यू इंटरनॅशनल हॉटेल येते, रंगा रंग अवॉर्ड समारंभात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एडवोकेट रुजूल पाटणकर यांना देण्यात आला आहे. एडवोकेट पाटणकर हे सावंतवाडी- कोलगाव येथे त्यांनी सीबीएससी धरतीवर स्कूल सुरू केले आहे. या स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम हाती घेत आहेत. एक उपक्रमशील संस्थाचालक म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांना हा यंदाचा अवॉर्डप्रदान करण्यात आला आहे. पाटणकर गॅस एजन्सीच्या प्रमुख ऋचा पाटणकर व श्री पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एडवोकेट रुजूल पाटणकर शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत . त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.