वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्लीत एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. दिल्लीच्या भैरो मार्गाजवळ एक लोकल ईएमयू रेल्वे रूळावरून घसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून टेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या दुर्घटनेमुळे सदर मार्गावरील रेल्वे वेळापत्रक कोलमडले होते. अपघातग्रस्त झालेली रेल्वे हरियाणातील पलवल येथून दिल्ली स्टेशनच्या दिशेने जात होती. अपघाताच्या वेळी रेल्वेमध्ये अनेक प्रवासी चढले होते. यावेळी रेल्वे ऊळावरून घसरून मोठे नुकसान झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे डीसीपी रेल्वेने सांगितले