इंग्लंडची मालिकेत 1-1 बरोबरी, अष्टपैलू बेन स्टोक्स सामनावीर- रॉबिन्सनचे 4, अँडरसनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
येथे झालेल्या दुसऱया कसोटीत यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा तिसऱया दिवशीच एक डाव 85 धावांनी दणदणीत पराभव कग्नरीत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. अष्टपैलू कामगिरी करणाऱया बेन स्टोक्सला सामनावीराचा बहुमान मिळाला.
द.आफ्रिकेचा पहिला डाव 151 धावांतच गुंडाळून इंग्लंडने या विजयाची पायाभरणी केली होती. त्यानंतर यजमानांनी कर्णधार बेन स्टोक्स (103) व यष्टिरक्षक बेन फोक्स (नाबाद 113) यांनी शतके नोंदवत पहिला डाव 9 बाद 415 धावांवर घोषित केला. या दोन शतकवीरांनी सहाव्या गडय़ासाठी 173 धावांची भागीदारी करीत संघाला द.आफ्रिकेवर 264 धावांची आघाडी मिळवून दिली. द.आफ्रिकेच्या ऍन्रिच नॉर्त्जेने 3, केशव महाराजने 2 बळी मिळविले.
पहिल्या डावाप्रमाणे द.आफ्रिकेचा दुसरा डावही रॉबिन्सन, अँडरसन, स्टोक्स यांच्या भेदक माऱयापुढे 85.1 षटकांत केवळ 179 धावांत कोलमडला. फक्त कीगन पीटरसन (42) व रास्सी व्हान डर डय़ुसेन (41) यांनीच इंग्लंडच्या गोलंदाजांचा थोडाफार प्रतिकार केला. त्यांनीच संघाला शतकी मजल मारून देताना 87 धावांची भागीदारी केली. स्टोक्सने डय़ुसेनला बाद करून ही जोडी फोडली. नंतर स्टोक्सने पीटरसनलाही 42 धावांवर बाद केले. यावेळी द.आफ्रिकेची स्थिती 5 बाद 151 अशी होती. यानंतर इंग्लंडने अचूक मारा करीत द.आफ्रिकेचा डाव झटपट गुंडाळला. तळाच्या फलंदाजांना केवळ 28 धावांची भर घालता आली. त्याआधी एर्वीने 25, व्हेरेनने 17, हार्मरने 16 धावा केल्या.
इंग्लंडने डावाने विजय मिळवित पहिल्या कसोटीतील पराभवाची येथे परतफेड केली. अँडरसनने 30 धावांत 3, ऑली रॉबिन्सनने 43 धावांत 4 आणि स्टोक्सने 30 धावांत 2 बळी मिळविले. इंग्लंडने या सामन्यात सर्वच विभागात सरस कामगिरी करीत पाहुण्यांवर विजय साकार केला. उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी 8 सप्टेंबरपासून द ओव्हल मैदानावर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः द.आफ्रिका प.डाव्ा 151, इंग्लंड प.डाव 106.4 षटकांत 9 बाद 415 डाव घोषित ः झॅक क्रॉली 38 (5 चौकार), ऑली पोप 23 (4 चौकार), रूट 9, जॉनी बेअरस्टो 49 (7 चौकार), स्टोक्स 103 (163 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), फोक्स नाबाद 113 (217 चेंडूत 9 चौकार), ब्रॉड 21 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ऑली रॉबिन्सन 17 (22 चेंडूत 2 चौकार), लीच 11 (2 चौकार), अवांतर 27. गोलंदाजी ः नॉर्त्जे 3-82, केशव महाराज 2-78, रबाडा 2-110, हार्मर 1-73, एन्गिडी 1-61.
द.आफ्रिक दुसरा डाव 85.1 षटकांत सर्व बाद 179 ः एर्वी 25 (2 चौकार), एल्गार 11 (1 चौकार), पीटरसन 42 (1 चौकार), मॅरक्रम 6, व्हान डर डय़ुसेन 41 (5 चौकार), व्हेरेन 17 (2 चौकार), हार्मर 16 (1 चौकार), अवांतर 17 गोलंदाजी ः रॉबिन्सन 4-43, अँडरसन 3-30, स्टोक्स 2-30, ब्रॉड 1-24.
950 आंतरराष्ट्रीय बळी टिपणारा अँडरसन पहिला ‘पेसर’
इंग्लंडचा जेम्स अँडरसन हा क्रिकेटमध्ये 950 आंतरराष्ट्रीय बळी नोंदवणारा पहिला वेगवान गोलदांज बनला आहे. येथील ओल्ड ट्रफोर्डवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीत त्याने हा पराक्रम केला.
अँडरसनने द.आफ्रिकेच्या दुसऱया डावात सायमन हार्मरला 16 धावांवर अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करून त्याने हा माईलस्टोन गाठला. या विक्रमानंतर चाहत्यांनी जल्लोष करीत अँडरसनचे अभिनंदन व कौतुक केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज ग्लेन मॅकग्राला (949 बळी) मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आघाडीचा जलद गोलंदाज होण्याचा मान मिळविला. 287 सामन्यात अँडरसनचे आता 951 बळी झाले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो चौथ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. या यादीत लंकेचा मुरलीधरन (1347 बळी) सर्वात आघाडीवर असून ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलदांज शेन वॉर्न (1001 बळी) दुसऱया, भारताचा अनिल कुंबळे (956 बळी) तिसऱया स्थानावर आहे.
क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी नोंदवणारे गोलंदाज
गोलंदाज / सामने / देश / बळी / डावात सर्वोत्तम / सामन्यात सर्वोत्तम / इकॉनॉमी
मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका / 495 / 1347 / 9-51 / 16-220 / 2.92
शेन वॉर्न / ऑस्ट्रेलिया / 339 / 1001 / 8-71 / 12-128 / 2.98
अनिल कुंबळे / भारत / 403 / 956 / 10-74 / 14-149 / 3.11
जेम्स अँडरसन / इंग्लंड / 387 / 951 / 7-42 / 11-71 / 3327
ग्लेन मॅकग्रा / ऑस्ट्रेलिया / 376 / 949 / 8-24 / 10-27 / 2.93
वासिम अक्रम / पाकिस्तान / 460 / 916 / 7-119 / 11-110 / 3.17
शॉन पोलॉक / द. आफ्रिका / 423 / 829 / 7-87 / 10-147 / 2.92
स्टुअर्ट ब्रॉड / इंग्लंड / 335 / 802 / 8-15 / 11-121 / 3.44
वकार युनूस / पाकिस्तान / 349 / 789 / 7-36 / 13-135 / 3.88
चमिंडा वास / श्रीलंका / 439 / 761 / 8-19 / 14-191 / 3.30.