साळ येथील विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा स्तुत्य उपक्रम
लाटंबार्से : बुध्दीची देवता श्री. गणेश मंदिरात जाऊन सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन साळ येथील पाल्य , पालक व शिक्षकांनी मिळून कृपा आशिर्वाद घेऊन शैक्षणिक वर्ष 2023।24 चा श्री गणेशा केला. प्रारंभोत्सव या मथळ्याअंतर्गत सदर उपक्रम शिक्षक, पालक व विद्यार्थांनी मिळून आयोजित केला होता. ठ विद्यार्थ्या लाभते विद्या …..ठ या गणपती स्तोत्र चे पठन विद्यार्थीनी स्वानंदी मणेरीकर व अनघा डेगवेकर यांनी करून श्री. गणेश देवाचा आशिर्वाद घेतला. शाळेचे मुख्याध्यापक धाकटू पाटील यांनी उपस्थित पालक व विद्यार्थांचे स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांबरोबर पालक व शिक्षकांनी ’साक्षरतेचा दिवा’ गणेश मंदिरातून पेटवून पुर्ण वाड्यावर मिरवणूकीद्वारे फिरवून पुनर्वसन विद्यामंदिरात घेऊन आले. सदर मिरवणूकीत’ जिथे शाळा राहणार नाही तिथे कसा होईल देशाचा विकास ’ , ’आम्ही सर्वांनी ठरवले आम्हाला भारत सुशिक्षित बनवायचा आहे’, ’ नवी उमेद नवी आशा नवलाईने भरेल पुनर्वसन शाळा’, ’पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास, पुनर्वसनाची शाळा देते’. ’पुनर्वसनची मुले न्यारी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई’, ’पुनर्वसनाची शाळा आम्हाला जीवनाचे ज्ञान देते आणि भविष्यासाठी तयार करते,’ ’शाळेवर प्रेम करा-जीवनाचा उध्दार करा’, ’शाळेत जा, वाचा, लिहा, घराचे नाव उज्ज्वल करा’, ’आम्ही सर्वांनी ठरवले आम्हाला भारत सुशिक्षित बनवायचा आहे’, आमच्या चांगल्या भविष्याचा साथीदार पुनर्वसनची शाळा.’ यासारखी घोषवाक्य मुलांच्या हातातील फलकावर पहायला मिळाली. सदर उपक्रमावेळी चौथीच्या मुलांनी नविन रूजू झालेल्या विद्यार्थांना ओवाळणी करून शाळेत घेतले. सदर उपक्रमाला शिक्षिका स्मिता राऊळ, रेश्मा नाईक व पालक संजना सावंत, प्राची मणेरीकर, स्नेहल शेट्यो, संस्कृती जाधव, ओवी सुतार, स्वेच्छा झोरे, महेश्वरी गवस, ज्योती सावंत, नमिता पिरणकर, साक्षी म्हावळणकर, विक्रम कुमार, कृष्णकांत गवस, श्रीकृष्ण गवस, रामचंद्र मणेरीकर आदी उपस्थित होते.