बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने मंगळवारी शिवबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगाव परिसरातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या ध्येय-धोरणांशी कटिबद्ध राहत शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा कार्यकर्त्यांनी दिले.
प्रारंभी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू, असे सांगण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, चंद्रकांत कोंडुसकर, युवा सेनेचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे, प्रदीप सुतार, राजू कणेरी, उमेश लोहार, महांतेश आवळाप्पगोळ, प्रसाद कुडतरकर, बळवंत शिंदोळकर, प्रतिक देसूरकर, वृषभ भोसले, तेजस लगाडे, आकाश डुकरे, एस. चंद्रशेखर, अनिल हट्टीकर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.