बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर येथे नॅशनल लॉ विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धडपड करीत असतात. मात्र, साऱयांनाच ते शक्मय नाही. तेव्हा उत्तर कर्नाटकातील बेळगावातही नॅशनल लॉ विद्यापीठ सुरू करावे, या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
बेळगाव जिल्हय़ाचा विस्तार वाढत चालला आहे. या ठिकाणी मराठा लाईट इन्फंट्री, एअरफोर्स, सुवर्णसौध, विद्यापीठे तसेच औद्योगिक वसाहत आहे. बेळगाव जिल्हा आणि शहराचा विस्तार झपाटय़ाने वाढत आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ, राणी चन्नम्मा विद्यापीठ, केएलई सोसायटीमार्फत उच्चशिक्षण बेळगावात मिळत आहे. अनेक लॉ कॉलेजिस आहेत. मात्र नॅशनल लॉ विद्यापीठ बेळगावात स्थापन झाले तर त्याचा निश्चित फायदा होणार आहे. तेव्हा बेळगावात हे विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
बेळगाव जिल्हा महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवर वसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या बेळगाव जिल्हय़ाकडे वाढत आहे. तेव्हा याचाही विचार करून नॅशनल लॉ विद्यापीठ स्थापन करावे, असे निवेदनात म्हटले आहे. शिरस्तेदार एम. एन. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी गिरीराज पाटील, जॉईंट सेपेटरी बंटी कपाई, सदस्य अभिषेक उदोसी, आदर्श ए. पाटील, पी. के. पवार, एम. बी. जिरली, सदानंद हिरेमठ, विजया गज्जी, आर. पी. पाटील, मोहन मावीनकट्टी, प्रवीण करोशी, वाय. एन. सुतार, मारुती कामाण्णाचे यांच्यासह वकील उपस्थित होते.