प्रतिनिधी /पणजी
धर्मांतराला विरोध करणाऱया गोमंतकियांचा पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून अनन्वित छळ केला. त्यांच्या या दुष्कृत्याची साक्ष म्हणून जुने गोवे येथे उभ्या असलेल्या ‘हात कातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीने पणजीत आयोजित केलेल्या हिंदु-राष्ट्र संघटन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई, स्वराज्य संघटनेचे प्रशांत वाळके, शिवयोद्धा संघटनेचे अध्यक्ष शिवप्रसाद जोशी, पदाधिकारी माधव विर्डीकर, दत्तराज केरकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, हिंदु रक्षा महाआघाडीचे संदीप पाळणी, केसरिया हिंदु वाहिनीचे राजीव झा, हिंदुत्वनि÷ अधिवक्ता तन्मय गावस, निवृत्त सैन्य अधिकारी प्रवीण चंद्रा, बी. एस. नेगी, शिवनारायण शुक्ला, स्वागत गावस, आदींची उपस्थिती होती.
बैठकीत प्रारंभी श्री. शिंदे यांनी ‘हात कातरो खांबा’चे ऐतिहासिक महत्त्व विशद् केले. त्याचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच या खांबाच्या संरक्षणासाठी समितीने आतापर्यंत केलेले प्रयत्न व पत्रव्यवहार याची माहिती देऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत मार्गदर्शन केले.
श्री. वाळके यांनी सदर खांबा’चे संवर्धन तसेच पर्यटनाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठिकाण बनावे यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याचे दायित्व समितीचे राहणार असल्याचे म्हटले. उपस्थित हिंदुत्वनि÷ांनी त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे ठरवले.
बैठकीत प्रारंभी श्रीगणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे पदाधिकारी यांच्यासमवेत विचारविनिमय करण्यात आला. कालापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी विष्णु साळकर यांनी अनेक बहुमूल्य सूचना केल्या. समितीचे सत्यविजय नाईक यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. गोविंद चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.