35 हजार मिळतो पगार
आतापर्यंत तुम्ही माणसांना नोकरीवर जाताना पाहिले असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होण्यासोबत रोबोट देखील रेस्टॉरंटपासून काही कार्यालयांमध्ये कामाची जबाबदारी सांभाळू लागला आहे. परंतु तुम्ही कुठल्या प्राण्याला रितसर पगार घेऊन काम करताना पाहिले आहे का? एका कंपनीने श्वानालाच नोकरीवर ठेवले आहे.
चीनमधील पेट सप्लाइज फर्मने एका श्वानाला नोकरीवर ठेवले आहे. नोकरीकरता श्वानाला दर महिन्याला वेतन दिले जाते. या श्वानाची सॅलरी स्लिप कंपनीने सोशल मीडियावर शेअर केल्यावर हे वृत्त व्हायरल झाले आहे, कारण आतापर्यंत कुठल्याही प्राण्याने पगारदार नोकर म्हणून काम केले नव्हते.
चीनच्या गुआंगडॉन्ग प्रांतातील ही घटना आहे. येथे पाळीव प्राण्यांसाठी उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीने स्वत:च्या परिसरात एका श्वानाला नोकरी दिली आहे. श्वानाचे पद सिक्युरिटी कॅप्टनचे असून त्याला याकरता दर महिन्याला 3 हजार युआन म्हणजेच 35 हजार रुपयांचे वेतन मिळत आहे. या श्वानाची सॅलरी स्लिप आता चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या श्वानाला तसा पूर्ण पगार मिळतो, परंतु एका महिन्यात त्याच्या पगारातील 1200 युआन कापण्यात आले होते, कारण या श्वानाने कंपनीच्या मालमत्तेला नुकसान पोहोचविले होते.
या श्वानाचे नाव बिग ब्युटी असून त्याला पगार रिम्बर्समेंट म्हणून मिळतो, या श्वानाला उत्तम आहार दिला जातो. या कंपनीत आणखी काही प्राण्यांना ठेवण्यात आले आहे, परंतु पगार केवळ याच श्वानाला दिला जातो. हा श्वान येथे 7 वर्षांपासून काम करत आहे. या कंपनीत पूर्वी डोरमॅन म्हणून पाळीव श्वान काम करायचा, त्याच्या मृत्यूनंतर कंपनीने बिग ब्युटीला कामावर ठेवले आहे. श्वान दरवाजावर नजर ठेवणे, उंदीर पकडणे, नव्या उत्पादनांचे परीक्षण इत्यादी कामांसाठी उपयुक्त आहे.