पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि तेहरिक ए इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक होण्याची शक्य़ता असून इस्लामाबाद पोलीसांनी इम्रान खान यांच्या निवासस्थानाला वेढा घातल्याचे पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना माजी पंतप्रधानांनी एका महिला दंडाधिकाऱ्याला धमकावल्याले असल्याचा आरोप ठेऊन इस्लामाबादच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. नंतर ते १६ मार्चपर्यंत स्थगित केले गेले. इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झेबा चौधरी आणि इस्लामाबाद पोलिस अधिकार्यांना धमकी दिल्याबद्दल इम्रान खान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी कंटेनर लावून पाकिस्तान इम्रान खान यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले. तसेच दंगल करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तयारी केल्याचे पीटीआयने सांगितले.
सरकारने शहरातील रॅलींवर घातलेल्या बंदी झुगारून लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांवर झालेल्या कारवाईत अध्यक्ष खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लाहोर पोलिसांनी इम्रान खान आणि इतर ४०० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.