२६ जुलै कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने माजी सैनिकांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.रामतीर्थ नगर, बेळगाव येथे डॉ रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या वतीने आज २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी हुतात्मा जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
समारंभात माननीय अतिथी माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनील पाटील तर प्रमुख पाहुणे कोब्रा कमांडो कॅम्पचे डीआयजिपी रवींद्रन एम एल हे उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कारगिल युद्धाची परिस्थिती आणि देशाच्या सुरक्षेत तत्पर असलेल्या सैनिकांच्या कामगिरीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.यासंदर्भात आयोजक डॉ रवी पाटील यांनी कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली.
यावेळी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व इतर गणमान्य उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर तसेच रामतीर्थनगर माजी सैनिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.