वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ नाका येथे शुक्रवारी सकाळपासून खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे. मोठा पाईप घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. यामुळे सकाळपासून अनगोळ नाका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. वाहतुकीची कोंडी झाल्याने बऱयाच वाहने अडकून पडली होती.
बिग बाजारपासून पेट्रोलपंपाच्या कॉर्नरपर्यंत रस्त्याची खोदाई केली जात आहे. जेसीबीने खोदाईचे काम सुरु असल्यामुळे या परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. खोदाई करून त्यामध्ये पाईप घातले जाणार आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात वाहतुकीची केंडी होत होती. सकाळ सत्रात शाळा, महाविद्यालयांना जाणाऱया विद्यार्थी व पालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.