वाळपई : रामलीला मैदान रायगड येथे 2 जून रोजी राष्ट्रीय रामायण महोत्सवांमध्ये सत्तरी तालुक्यातील नानोडा बांबर रणमाले पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. राम ओझरकर यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने नुकतेच रायगड येथे हे सादरीकरण केले. दुपारी 2 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 2.30 वा. सामूहिक महापाठ, स्थानिक कलाकारातर्फे हनुमान चालीसा सादर करण्यात आली. त्यानंतर दुपारी 2.30 ते रात्री 8.30 दरम्यान आयोजित केलेल्या महोत्सवांमध्ये झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, ओडिसा, हिमाचल प्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सांस्कृतिक कला सादर केल्या. नानोडा बांबर येथील राम ओझरेकर हे उत्कृष्ट रणमाले कलाकार आहेत. आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली रणमाले पदकाने देशाच्या अनेक भागांमध्ये कला सादरीकरण केली आहे. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्यातील अनेक भागांमध्ये रणमाले पथक तयार करण्यासाठी त्यांचा मोठा हातभार आहे. या पथकामध्ये राम ओझरेकर, अशोक भाटेकर, अंकुश ओझरेकर, अजित हरवळकर, अमित हरवळकर, उमेश कुडतरकर, शिवाजी ओझरेकर, राम भाटेकर, मदन गावकर, प्रज्योत म्हाळशेकर, शाबानंद गावकर, शिवदत्त हरवळकर, चंद्रकांत उस्तेकर, गोविंद गवळकर, नकुल गावकर, श्रीविजय कोपर्डेकर यांचा समावेश आहे. यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या रणमाले पथकाने गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक खात्याचे आभार व्यक्त केले आहेत. गोव्याचे सांस्कृतिक व पारंपरिक कला संवर्धनासाठी सरकार सातत्याने पाठबळ देत आहे. ग्रामीण भागातील कलेला वाव मिळावा व ही कला विकसित व्हावी यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने सहकार्य करीत असते. याबद्दल पथकाने आनंद व्यक्त केला. गोव्याची रणमाला कला आतापर्यंत कशाप्रकारे जिवंत राहिली याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यामध्ये ज्येष्ठ कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. यात प्रत्येक ग्रामीण भागातील तऊण कलाकाराने भाग घ्यावा व येणाऱ्या काळातही ही कला विकसित करण्यासाठी योगदान द्यावे, अशी विनंती केली. सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये आजही रणमाले पथकाची निर्मिती होऊ लागलेली आहे हे चांगली बाब आहे. येणाऱ्या काळात ही पथके निश्चितच या कलेला योग्य पद्धतीने वाट मोकळी करून देतील अशी प्रतिक्रिया वेळी त्यांनी व्यक्त केली.
Previous Articleतपोभूमीच्या शैक्षणिक भवनातून संस्कार पूर्ण शिक्षण मिळणार
Next Article जुनसवाडा पठारावर वृक्षारोपण कार्यक्रम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.