बेळगाव : ‘एक नूर आदमी दस नूर कपडा’ असे म्हटले जाते. पोशाखाचा प्रभाव निश्चितच पडतो. अलीकडे तर वस्त्रप्रावरणांचे दालन इतके भव्य झाले आहे की, निवडीला अमर्याद स्वातंत्र्य आहे. त्यातही साडी हा महिलांच्या विशेष आवडीचा प्रांत. आज साड्यांमध्ये शेकडो नमुने उपलब्ध आहेत. साड्यांमधीलच एक अत्यंत महत्त्वाचा मुंबई येथील ब्रँड म्हणजे ‘सायली राजाध्यक्ष सारीज’. नावातच साड्यांचा उल्लेख असल्याने साड्या हेच या ब्रँडचे वैशिष्ट्या आहे. हा ब्रँड सहा वर्षांपूर्वी सुरू झाला. स्वत: सायली यांना हँडलूमच्या साड्यांबद्दल विशेष आत्मियता आहे आणि यामुळेच त्यांनी हा ब्रँड सुरू केला.
याच ब्रँडअंतर्गत ‘सायली राजाध्यक्ष सारीज’ यांच्या साड्यांचे प्रदर्शन येत्या रविवारी बेळगावमध्ये होत आहे. डॉ. अनुपमा जोशी यांच्या क्रिएटिव्ह सोल्सतर्फे हे प्रदर्शन प्रथमच भरत आहे. सायली सारीजमध्ये प्रामुख्याने हँडलूम, हँडब्लॉकचे कपडे पाहायला मिळतात. हँडलूममध्ये कांजीवरम, बनारसी, टसर सिल्क, रॉ सिल्क, सॉफ्ट सिल्क, गढवाल असे प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय कॉटनमध्ये कांची कॉटन, कॉटन इलकल, पट्टेदा अंचू, कॉटन पैठण्या तर आहेतच, पण प्रामुख्याने हँडब्लॉक प्रिंटेड साड्यांचे मोठे कलेक्शन आहे. भारतात हँडब्लॉक प्रिंटिंगचे काम राजस्थान आणि गुजरात येथे प्रामुख्याने होते. राजस्थानच्या बगरू आणि सांगानेर येथे तर गुजरातमध्ये कच्छच्या भूजच्या आसपास अझरक
हँडब्लॉक प्रिंटचे काम होते, जे फार नजाकतीने केले जाते. यामध्ये पारंपरिक तसेच समकालीन डिझाईन्सचा वापर केला जातो. सायली सारीजमध्ये या दोन्ही प्रिंटमधल्या साड्या उपलब्ध आहेत. प्लेन लिनन साड्या, चंदेरी ब्लॉक प्रिंटेड साड्या, महेश्वरी साड्या याशिवाय टसर साड्यांमध्ये कॉर्पोरेट वेअरचे एक मोठे दालन आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, बँकर्स अशा महिलांना या साड्यांमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. रेडिमेड विभागामध्ये सगळ्यात मोठा विभाग आहे तो ब्लाऊजचा. सायली सारीजकडे जे ब्लाऊज आहेत, ते एकच ब्लाऊज अनेक साड्यांवर वापरता येतील किंवा मिक्स अँड मॅच करता येतील. बेळगावमध्ये प्रथमच 24 सप्टेंबर रोजी युके-27 फर्न या हॉटेलमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.